अमरावती: शहरात दैव बलवत्तर म्हणून एका चार वर्षीय मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. हा मुलगा खेळता खेळता विहिरीत पडला. हे लक्षात येताच वडिलांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र विहीर अरुंद असल्याने दोघेही आत अडकले. या दोघांनाही अग्निशमन दलाने ” बनून वाचवलं आहे. ( )

वाचा:

अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात बनकर हॉस्पिटल जवळ रोडवर ही घटना घडली. येथील साइतीर्थ अपार्टमेंटच्या विहीरीजवळ दोन लहान मुल खेळत असतानाच अचानक मनस्व (वय ४ वर्षे ) हा विहिरीत पडला. आरडाओरडा झाल्यावर लगेचच त्याचे वडील मनीष मानकर यांनी धाव घेतली व मुलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. विहिर खूपच अरुंद असल्याने दोघेही कसेबसे काठ धरून स्वतः चा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रसंगावधान दाखवत त्यांचे शेजारी शुभम मोरे यांनी अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली.

वाचा:

अग्निशमन दलाला फोन करताच तातडीने अग्निशमन जवान घटनास्थळाकडे रवाना झाले. वाहन चालक पप्पू निभोरकर यांनी रस्ता रिकामा असल्याने अवघ्या तीन मिनिंटात देवदूत हे वाहन घटनास्थळी पोहचवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ शिडी व दोरी टाकून मनीष आणि मनस्व या दोघांनाही अवघ्या १५ मिनिटांत सुखरूप बाहेर काढले व त्यांचा जीव वाचवला. याबद्दल सर्वांनी अग्निशमन रेस्क्यू टीमचे अभिनंदन केले. अग्निशमन अधीक्षक अजय पंढरे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक (पप्पू) अभिषेक निभोरकार, फायरमन हर्षद दहातोंडे, अमोल साळुंके ,सूरज लोणारे, कंत्राटी फायरमन जयकुमार वानखडे, शुभम जाधव हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here