: सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद निवडीच्या वादातून सोलापुरात शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांमधला वाद विकोपाला गेला असून दोघांचं गाऱ्हाणं मातोश्रीपर्यंत न थांबता थेट कोर्टात गेलं आहे. या वादाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत स्थानिक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक चक्रावले आहे. ( )

वाचा:

नगरसेवक यांनी कांही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यावर मांडवलीचे आरोप केले होते. त्यानंतर जिल्हाप्रमुख बरडे यांनी १९८५ पासून सेनानिष्ठ असल्याचे सांगत आरोपकर्ते नगरसेवक शेजवाल यांच्यावर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर आपण दलित असल्यानेच आपल्याला संपविण्याचा प्रयत्न बरडेंकडून सुरु असल्याचा आरोप शेजवाल यांनी केला आहे.

वाचा:

दरम्यान, या परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपाबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वरिष्ठ नेतृत्वाला माहिती दिली आहे, मात्र मातोश्रीवरून अद्याप कोणतेच फर्मान न आल्याने सोलापुरातल्या शिवसेनेतील चिखलफेक शहर-जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांच्या भूमिकेकडे!

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here