: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती.

स्विटीची २०१९ मध्ये फेसबुकवरून राजसोबत ओळख झाली. दोघे फेसबुकवर चॅटिंग करायला लागले. त्याने स्विटीला लग्नाची मागणी घातली. तिने होकार दिला. स्विटीने आई-वडिलांना याबाबत सांगितले. तिच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. दोन महिन्यांपूर्वी स्विटी नागपुरात आली. ती राजसोबत आदर्शनगर येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागली. स्विटी आपली पत्नी असल्याचे राजने घरामालकाला सांगितले होते.

वाचा:

दरम्यान, राज हा एमआयडीसीत कामाला लागला. शुक्रवारी सकाळी स्विटीचा राजसोबत वाद झाला. काही वेळाने राज कंपनीत गेला. स्विटीने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. शेजाऱ्याने खिडकीतून बघितले असता स्विटी गळफास घेतलेली दिसली. शेजाऱ्याने राजच्या मोबाइलवर संपर्क साधला. एका नागरिकाने गिट्टीखदान पोलिसांना कळविले. पोलिस व राज हा घरी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून स्विटीचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here