म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गर्दी नियोजनाच्या उपायांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने शहरात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गर्दी विभागण्यासाठी सरकारकडून बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र करोना नियंत्रणात आल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा करोना रुग्णांची वाढती संख्या, अनेक जिल्ह्यांत लागू झालेले लॉकडाउन या धर्तीवर मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अनलॉकमध्ये शहरातील सरकारी आणि खासगी कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी संघटनांनी एकमुखाने कार्यालयीन वेळ बदलण्याची मागणी केली होती. लॉकडाउनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळेत बदल करावे, यामुळे गर्दी विभागली जाईल आणि व्यवहारही सुरू राहतील, अशी भूमिका व्यापारीवर्गाने घेतली होती.

वाचा:

‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना मुंबईतील कंपन्यांमध्ये सुरू आहे. मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. कार्यालयीन वेळेत बदल केला नसल्याने सकाळी आणि सायंकाळी रेल्वे स्थानके, बस स्टॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच वेळेत बेस्ट, एसटी, रिक्षा-टॅक्सी यांमधून प्रवासी वाहतूक होताना करोना नियम खुलेआम पायदळी तुडवले जातात.

९५ टक्के फेऱ्या सुरू आहेत. सकाळ-सायंकाळ गर्दीची वेळ वगळता अन्य वेळेत लोकलमध्ये कमी गर्दी असते. लोकल फेऱ्या जास्त असल्याने प्रवासात नियम पाळणे शक्य होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांचा आहे.

वाचा:

लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अडगळीत पडलेला कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्तावावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मुंबईतील कपडे, सराफा, मोबाइल, भांडी बाजार यांनी वेळा आखून द्याव्यात. तसेच मंत्रालयातील विभागांसह सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

… तर नकारात्मक परिणाम

करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत प्रशासनाबाबत बैठक घेऊन लॉकडाउन करावा लागेल, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले. सरकारकडून वारंवार विनंती करून ही नियम मोडणाऱ्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. असे असले तरी काही लोकांसाठी सरसकट लॉकडाउन लागू केल्यास जनजीवनावर तसेच राज्याच्या तिजोरीवर नकारात्मकच परिणाम दिसतील, असे मत मांडले जात आहे.

नियमांची अंमलबजावणी हवी

करोना लॉकडाउनची झळ समाजातील प्रत्येक घटकाला बसली आहे. करोनाकाळात उत्पन्न घटल्यामुळे सरकारलाही मदत करताना मर्यादा येत आहेत. अशावेळी पुन्हा लॉकडाउन करण्याआधी गर्दी नियोजनाच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, असा सूर मुंबईकरांमधून उमटत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here