म.टा. प्रतिनिधी,
‘देशात सर्वात मोठी समस्या ही गरीबी, भूकमरी आणि बेरोजगारीची आहे. युवकांना रोजगार मिळाला तर या तीनही समस्या सुटू शकतात. त्यासाठी भाषण नको, प्रत्यक्ष कृतीची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री यांनी शनिवारी केले.

वाचा:

फॉर्च्युन फाउंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या ऑनलाइन उद्घाटनाप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले,’आज आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. पण, या स्वातंत्र्याचे सुराज्य, रामराज्य व्हावे, यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांचे कल्याण व्हायला हवे. त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावत आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी चांगले काम करायला हवे. देशाला स्वराज्य मिळाले मात्र आता सुराज्य निर्माण करण्याची खरी गरज आहे.’ महापौर म्हणाले,’मुंबई, पुणे, औरंगाबादेत फार मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. त्या तुलनेत विदर्भात औद्योगिकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे. ते वाढविण्यावर भर द्यायला हवा. नागपूर महानगरपालिकेत माँ जिजाऊ यांच्या नावाने प्रकल्प सुरू होणार असून त्या अंतर्गत महिलांना रोजगार मिळणार आहे.’ आभार फाउंडेशनचे उपाध्यक्ष सहारे यांनी मानले.

प्रत्येक खेड्यात हवा उद्योग

खादी आणि ग्रामोद्योग आयोगांतर्गत प्रत्येक खेड्यात दोन उद्योग सुरू व्हायला हवेत. पाचगावात चिंधीपासून गालिचा तयार करण्यात येतो. ४०० ते ५०० रुपयात हा गालिचा मिळतो. केवळ चाळीस हजारात एक महिला आपल्या घरी हा उद्योग सुरू करू शकते. त्याशिवाय शेणापासून तयार करण्यात आलेल्या ऑईल पेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खेड्यातून पाचशे रुपयांचे शेण जरी विकले तरी महिन्याला हजारो रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. त्याशिवाय गोमुत्रातून मिळणारे अमिनो अॅसिड शेतकऱ्यांसाठी आर्थिक संजीवनी असल्याचे गडकरी म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here