मुंबई : इंधन दरवाढीवरून विरोधकांनी केंद्र सरकारला संसदेत घेरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरांबाबत सावध भूमिका घेतली आहे. आज रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग दोन आठवडे देशात पेट्रोल आणि स्थिर आहे.

आज रविवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.

आज कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.

खनिज तेल उत्पादकांची संघटना असलेल्या ओपेक संघटनेने तेलाची उत्पादन कपात कायम ठेवली आहे. त्यानंतर ब्रेंट क्रूडच्या दरात वाढ झाली होती. शुक्रवारी अमेरिकन कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.४१ डॉलरने घसरला आणि ६५.६१ डॉलर झाला. तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.४१ डॉलरने घसरून ६९.२२ डॉलरवर बंद झाला होता.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची १६ वेळा वाढ झाली. या दरवाढीने पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले तर डिझेल ४.५२ रुपयांनी महागले आहे. नुकताच सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली होती. गॅस सिलिंडरचा भाव ८०० रुपयांवर गेला. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १२५ रुपयांची वाढ झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here