वाचा:
या प्रकरणात फरार असलेल्या बोठेला तब्बल साडेतीन महिन्यांनंतर काल अटक करण्यात आली. सकाळी त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सुपे पोलिस ठाण्यात आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याला लपून बसण्यासाठी मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन चंद्रप्पा यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेनंतरही या दोघांची पोलिसांकडून बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप जरे यांनी केला आहे.
वाचा:
जरे यांनी म्हटले आहे की, ‘आरोपीला अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार. मात्र, बोठे हा आरोपी आहे की सरकारचा पाहुणा? अशी शंका घेण्यासारखे पोलिसांचे वर्तन आहे. त्याला हैदराबादहून आणताना तिरंगा ध्वज लावलेल्या अलिशान मोटारीतून आणण्यात आले. त्याच्यासाठी पारनेरला स्वतंत्र कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला बेड्याही घालण्यात आलेल्या नाहीत. एवढे नीच कृत्य करणाऱ्या आरोपीला तिरंगा झेंडा लावलेल्या वाहनातून आणणे ही सहन न होणारी आणि संशयास्पद गोष्ट आहे. जरे यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणूनही याचा खेद वाटतो. या प्रकाराची ४८ तासांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आपण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत. राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे आपण यासंबंधी तक्रार करणार आहोत,’ असेही जरे यांनी सांगितले.
बोठे याला शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तेथून सरळ पारनेला मोटारीने आणण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी करून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
त्या पोलिसांना निलंबित करा- अॅड. लगड
बोठे याची बडदास्त ठेवणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वकील अॅड. सुरेश लगड यांनीही केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगड यांनी पत्र पाठविले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची बडदास्त ठेवणाऱ्या पोलीसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. बोठेची एवढी बडदास्त कशासाठी? पोलीसांची बोठेच्या तपासासाठी सहा सहा पथके पाठवुनही अखेर त्यास आलीशान कारमधून का आणले. त्याची कायद्याच्या पलीकडे जाऊन ठेप का ठेवली जात आहे. याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरूदध कारवाई करण्यात यावी,’ असेही अॅड. लगड यांनी म्हटले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times