पुणे: अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारला घेरणाऱ्या भाजपनं अधिवेशनानंतरही सरकारवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज सकाळीच एक ट्वीट केलं आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांची तारखेसह आकडेवारी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. ‘हे असं कधीपर्यंत चालणार?’ असा सवालही त्यांनी केला आहे. ( Slams Government)

वाचा:

‘आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या, तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पुण्यातील युवतीच्या मृत्यूसारख्या घटना स्मरणात आल्या,’ असं पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘ठाकरे सरकार याकडं कधी गांभीर्यानं लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,’ असे सवालही पाटील यांनी केले आहेत.

वाचा:

पुण्यातील एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूवरून काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षानं राज्य सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं होतं. सरकारमधील मंत्र्याचं नाव या प्रकरणात आल्यानं सरकारची गोची झाली होती. संबंधित मंत्र्याचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपनं दिला होता. त्यामुळं सरकारला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर अधिवेशन सुरू असतानाच मनसुख हिरन प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणी देखील भाजपनं सभागृहात सरकारला जेरीस आणलं. परिणामी या प्रकरणात आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली झाली व काल त्यांना ‘एनआयए’नं अटकही केली. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. चंद्रकांत पाटील यांचं हे ट्वीट त्याचंच द्योतक आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here