मुंबई: प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकानं () स्वत:च्या हातात घेऊन पोलीस अधिकारी यांना अटक केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे खासदार यांनी ‘एनआयए’च्या या तत्परतेवर शंका उपस्थित केली आहे. ‘जिलेटिनच्या २० कांड्यांसाठी राष्ट्रीय तपास संस्था ज्या पद्धतीनं मुंबईत आली आणि तपास केला, यामागे सरळसरळ राजकारण आहे. ‘एनआयए’ला दहशतवादाचा तपास करायचा होता की सचिन वाझे यांना अटक करून राजकीय हिशेब चुकता करायचा होता,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ( Slams Central Government Over Sachin Waze’s Arrest)

वाचा:

मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी राज्य सरकारच्या कारभारातील केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहीत आहे. मनसुख प्रकरणात ‘एनआयए’चा प्रवेश हा त्या क्षमेतवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडं दिला होता. एटीएसनं आतापर्यंत मुंबई, महाराष्ट्रच नव्हे देशातील अनेक प्रकरणांचा तपास केलाय. अनेक गुन्हेगारांना फासावर लटकवलंय. मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास केलाय. २६/११ चा हल्ला परतावून लावलाय. असं असताना जिलेटिनच्या कांड्यांसाठी राष्ट्रीय तपास पथक ज्या पद्धतीनं मुंबईत आलं. तपास केला ते आश्चर्यकारक आहे. ‘एनआयए’ला दहशतवादाचा तपास करायचा होता की सचिना वाझे यांना तुरुंगात टाकून राजकीय हिशेब पूर्ण करायचा होता,’ असा प्रश्न राऊत यांनी केला.

वाचा:

‘ह्याच सचिन वाझे यांनी काही महिन्यांपूर्वी या सगळ्यांच्या प्रिय टीव्ही अँकरला तुरुंगात ढकललं होतं. कुठल्याही दबावाखाली न येता टीआरपी घोटाळ्याचा तपास केला होता. मुंबईचे पोलीस कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. पण राज्यात घुसायचं. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा हेच सध्या सुरू आहे. केंद्राचा दबाव आणि दहशत आहे, हे दाखवण्यासाठीच ही कारवाई झाली आहे. गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे. पण ती शिक्षा देण्यास मुंबई पोलीस सक्षम नाहीत हे भाजपला आणि केंद्राला कोणी सांगितलं,’ असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here