सांगली दौऱ्यावर आले असता पटोले पत्रकारांशी बोलत होते. ‘ अंबानी हेच शेतकरी आंदोलनातील आरोपी होते, मात्र त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून भाजपनं अधिवेशन वाया घालवलं. अंबानींच्या कुटुंबीयांना झेड प्लस सुरक्षा मिळावी, तसंच त्यांच्या बंगल्यावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी फडणवीसांनी हा खटाटोप केला, असं पटोले म्हणाले.
वाचा:
‘राज्य सरकारवर खोटे आरोप करून, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून भाजपनं तीन महिने महाराष्ट्राला बदनाम केलं,’ असं पटोले यांनी सांगितलं.
राजभवन भाजपचं कार्यालय झालंय!
‘राज्यपाल हे केंद्राच्या इशाऱ्यावर चालतात, राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे महत्त्वाचं घटनात्मक पद आहे. असं असतानाही पक्षपातीपणा केला जात आहे. दिल्लीतून जो इशारा येईल त्या पद्धतीने राज्यपाल काम करत आहेत,’ असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times