मुंबई– ‘बिग बॉस १४’ मधून घराघरात पोहोचलेला सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. गायक असलेला राहुल सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. राहुल छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमारशी लवकरच लग्न करणार आहे. याची माहितीदेखील त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. चाहतेदेखील ते दोघे कधी लग्न करत आहेत याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्यापूर्वी राहुल बरेच दिवस कुटुंबापासून दूर राहिल्याने घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच त्याने एका मित्राच्या लग्नसमारंभात दिशासोबत हजेरी लावली होती. त्या समारंभाचे फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले. त्या फोटोंवरून काही नेटकऱ्यांनी त्याची थट्टा उडवली तर काहींनी त्याचं कौतुक केलं.

राहुल त्याच्या बालपणीच्या मित्राच्या लग्नाला गेला होता. त्या समारंभासाठी त्याने अनारकली स्टाईलचा कुर्ता घातला होता. त्याने पांढऱ्या रंगाचा अनारकली कुर्ता आणि त्यावर सोनेरी रंगाचं नक्षीकाम असलेलं जॅकेट घातलं होतं. त्याचे हे कपडे पाहून अनेकांनी त्याला रणवीर सिंगची उपमा दिली. त्यांनी तू रणवीरला कॉपी केलं आहेस, असंही कमेन्टमध्ये म्हटलं.

काहींनी त्याचं कौतुक केलं आणि म्हटलं, ‘तू प्रत्येक स्टाईलचे कपडे अगदी उत्तमरित्या कॅरी करतोस, तू प्रत्येक स्टाईलमध्ये छान दिसतोस.’ अनेकांनी तर त्याला तू दुसरा रणवीर दिसतोयस असं म्हटलं. तर काहींनी त्याची या कपड्यांवरून थट्टादेखील उडवली. त्यांनी राहुलला तू चुकून दिशाचा अनारकली ड्रेस घालून आलास तर नाही ना, असा प्रश्न विचारला. काहींनी त्याला ‘माझा बाजीराव’ असं म्हटलं. तर अनेकांनी तू आमचं मन जिंकलं, असं म्हटलं.

‘बिग बॉस १४’ मधून राहुलला खरी लोकप्रियता मिळाली. त्याचा बिग बॉसमधला खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेष म्हणजे आता राहुल चक्क रुबीना आणि तिचा पती अभिनवसोबत काम करण्यासाठी तयार आहे. त्याने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला. त्याने म्हटलं, ‘आमचं काही पूर्वीपासूनच शत्रुत्व नाही. मला वाटत की त्यांनी नेहमी खुश राहावं आणि मला लवकरच मामा किंवा काका बनवावं.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here