वाचा:
अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानासमोर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात एनआयएनं काल यांना अटक केली आहे. तत्पूर्वी आणि त्यानंतर झालेल्या त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येत आहेत. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा पाठलाग करणारी इनोव्हा कार ”नं काल रात्री ताब्यात घेतली. हीच कार अंबानी यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. ही कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन ड्रायव्हरना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ‘एनआयए’नं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांमध्ये वाझे यांचे विश्वासू मानले जाणारे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांचाही समावेश आहे.
स्फोटके आढळल्याच्या घटनेनंतर ही ‘इनोव्हा’ कार दुरुस्तीसाठी पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात पाठवण्यात आली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. यामागे काही विशिष्ट हेतू होता का? सचिन वाझे आणि त्यांची टीम या गाडीचा वापर काही विशिष्ट कामासाठी करत होती का?,’ असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times