मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकरणी (Antilia Case) अटक करण्यात आलेले मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक () यांना एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. वाझे यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. १० दिवसांची कोठडी मिळवल्यामुळे आता वाझे यांची चौकशी करण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे.

अटक केल्यानंतर सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर सुमारे १२ तास कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. चौकशीनंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज रविरारी त्यांना सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या वकिलांनी वाझे यांना १४ दिवसांची एनआयए कोठडी द्यावी अशी मागणी केली. कोर्टाने मात्र त्यांना २५ मार्च पर्यंत कोठडी ठोठावली.

एनआयएने ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उभी होती अशी सूत्रांची माहिती आहे. तेथूनच ही कार ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून तेथे उभी होती अशी माहिती उघड झाली आहे. या शिवाय या कारच्या मागे मुंबई पोलीस असे लिहिल्यामुळे या कारशी पोलीसांचा काही संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here