मुंबई : करोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र अशा स्थितीत दुसऱ्या बाजूला फोकस्ड इक्विटी फंडांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या श्रेणीत दमदार परतावा देणाऱ्या योजनांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फोकस्ड इक्विटी फंडाने एका वर्षात ५० टक्के परतावा दिला आहे.

गेल्या एक वर्षात (८ मार्च २०२१) इतर फंड घराण्यांच्या फोकस्ड फंडांपैकी आदित्य बिर्ला फोकस्ड फंडाने ३०.३९ टक्के परतावा दिला आहे. तर एसबीआय फोकस्ड फंडाने २५.४१ टक्के रिटर्न दिला आहे. ऍक्सिस म्युच्युअल फंडाच्या फोकस्ड २५ फंडाने याच काळात गुंतवणूकदारांना २६.८१ टक्के परतावा दिला आहे.

फोकस्ड इक्विटी फंड गुंतवणूकदारांची पसंतीची योजना ठरत असल्याचे गुंतवणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे. सेबीने या योजनेत केलेल्या सुधारणेनंतर या प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त ३० शेअरचा समावेश केला जाऊ शकतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या या योजनेने फोकस्ड इक्विटी फंडाच्या श्रेणीत जबरदस्त रिटर्न दिला आहे.

फोकस्ड फंडांचा उद्देश मोजक्याच शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवण्याचा आहे. कारण अशा शेअरमध्ये तेजीची शक्यता जास्त असते. करोना काळात फंड व्यवस्थापकांनी फोकस्ड फंडांच्या योजनांवर लक्ष केंद्रीत केले होते. या योजनेतील निधी हा अशा कंपन्यांमध्ये गुंतवला जातो ज्यांचा ताळेबंद मजबूत असून उत्पन्नाची शक्यता अधिक असते.

फोकस्ड इक्विटी फंडांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ही अशी योजना आहे जी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. या कंपन्या झपाट्याने सावरत असल्याने त्यांची कामगिरी चांगली होते. गेल्या एका वर्षात मार्चपासून अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत या कंपन्यांचे चांगले योगदान राहिले आहे. अर्थलाभडॉटकॉम या संस्थेच्या अहवालानुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फोकस्ड फंडाने ३ वर्षात १३ टक्के आणि ५ वर्षात १५ टक्के परतावा दिला आहे. ज्या कंपन्यांमध्ये वृद्धीची संधी आहे, अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने हे शक्य झाल्याचे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या फोकस्ड फंडाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली.

सध्या भांडवली बाजारात तेजी आहे. त्यामुळे फंड व्यवस्थापक अशा झपाट्याने वाढणाऱ्या शेअरच्या शोधात आहेत. ही योजना अशा क्षेत्रांचा शोध घेत आहे जी क्षेत्र अर्थव्यवस्ठेचा सुधारणेत मोठे योगदान देतील. या पोर्टफोलिओत अशा नावांचा समावेश आहे जे विकास पण करतील आणि गुंतवणूकदारांना दमदार परतावा देतील. या पोर्टफोलिओची अशा क्षेत्रात गुंतवणूक आहे ज्यात मोठ्या वित्तीय सेवा कंपन्या आहेत. तसेच सरकारी उपक्रम आणि ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here