म.टा.प्रतिनिधी, नागपूर

दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. ()

पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. ही वाघीण मरण पावल्यानंतर तिच्या मादी शावकाला पेंच व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले होते. तित्रलमांगी येथील सुमारे साडे पाच हेक्टर परिसरातील बंदिस्त जागेत तिचे संगोपन करण्यात येत होते. येथेच तिला शिकार करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते.

पाच मार्च रोजी या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आले होते. रेडिओ कॉलर लावून तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, खुल्या जंगलात दुसर्‍या वाघिणीशी झालेल्या संघर्षात तिला पायांवर, तसेच पोटावर जखमा झाल्या होत्या. वन विभागाने तातडीने या शावकाला पुन्हा बंदिस्त करून उपचार सुरू केले होते.

आठ मार्चपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सायंकाळी तिची तब्येत ढासळू लागली. त्यामुळे, तिला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात हलविण्याचा सल्ला पशुवैद्यकांनी दिला.

गोरेवाडा येथे हलविण्याची तयारी सुरु असतानाच रात्री १० च्या सुमारास ही वाघिण मरण पावली. रविवारी सकाळी या मृत मादी शावकावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार उपचार करण्यात आले.

उमरेड-कर्‍हांडलामध्ये शावकाचा मृत्यू

उमरेड- पवनी-कर्‍हांडला अभयारण्यांतर्गत कर्‍हांडला परिसरात एका व्याघ्र शावकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी वनरक्षकांच्या गस्तीदरम्यान ही घटना समोर आली. मृत शावकाचे वय सुमारे सहा ते सात महिने असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

कर्‍हांडला परिसरातील टी-१ या वाघिणीचा हा शावक आहे. ही वाघिण मागील दोन ते तीन दिवसांपासून टी-९ वाघाबरोबर याच परिसरात फिरत असल्याचे नोंदविण्यात आले होते. याच वाघाने शावकाला मारले असावे असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. शावकाचा मृत्यदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला.

क्लिक करा आणि वाचा-

या शावकाला मारणार्‍या नर वाघाचे पर्यटकांना शनिवारी घटनास्थळाच्या परिसरात दर्शन झाले होते. टी-९ हा नर वाघ मगील वर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून उमरेड-पवनी-कर्‍हांडला अभयारण्यात आला होता. तेव्हापासून तो याच अभयारण्यात स्थायिक आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here