अहमदाबाद, : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा चांगलाच बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची एकही धाव झालेली नसताना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

इंग्लंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या रुपात धक्का बसला. राहुल जेव्हा बाद झाला तेव्हा भारताची एकही धाव झाली नव्हती. ुण त्यानंर किशन आणि कोहली यांनी भारताचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी विजयाचा पायाही रचला. कोहलीपेक्षा यावेळी पहिलाच सामना खेळणार इशान हा अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत होता. इशानला यावेळी ४० धावांवर असताना जीवदानही मिळाले. बेन स्टोक्सने यावेळी इशानला जीवदान दिले. पण त्यानंतरही इशानने तुफानी फटकेबाजी सुरुच ठेवली आणि षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर इशान जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. इशानने आपल्या पहिल्याच सामन्यात ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची जबरदस्त खेळी साकारली.

पंत बाद झाल्यावर कोहली आणि रिषभ पंत यांनी फटकेबाज सुरुच ठेवली. पंतने यावेळी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. यावेळी कोहलीनेही पंतला चांगली साथ दिली. पण कोहलीपेक्षा पंत अधिक जास्त फटकेबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात पंत यावेळी बाद झाला. पण पंतने यावेळी १३ चेंडूंत २६ धावांची जबरदस्त खेळी साकारली. पंत बाद झाल्यावर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. श्रेयस आणि कोहली यांची चांगली जोडी जमली. कोहलीने यावेळी अर्धशतकही पूर्ण केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here