महापालिकेच्या एम पश्चिम विभागातील मे. चंजुलाल पी, लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता करापोटी रुपये ३८ लाख ८० हजार ७०५ इतकी थकबाकी होती. त्यांच्या विरोधात कारवाई करत महापालिकेने त्यांच्या मालकीची ‘बीएमडब्लू’ कार जप्त केली. त्यानंतर त्यांनी १९ लाख रुपये इतकी रक्कम जमा करुन आपली गाडी सोडवून नेली.
याबरोबरच एम पश्चिम विभागातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांनी मालमत्ता कराचे १ कोटी १० लाख २२ हजार २४० रुपये थकवले होते. कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने त्यांच्या मालकीची ‘ब्रीझा कार’ जप्त केली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस ‘सिल’ केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.
आयमॅक्स चित्रपटगृहाची पाणी पुरवठा बंद केला
महापालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभागातील ‘आय मॅक्स थिएटर’ ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये ७५ लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘एच पूर्व’ विभागातील मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा प्रकरणी तोडगा काढून २५ कोटी ८६ लाख रुपये इतका मालमता कर वसूल करण्यात आला. तसेच ‘मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.’ यांच्या विविध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून ३९ कोटी रुपये इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा-
‘के पूर्व’ विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’ यांच्या पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर या मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या ५०% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले.
क्लिक करा आणि वाचा-
अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात महापालिकेची ही धडक कारवाई राबवण्यात आली. या कारवाईनंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आज पर्यंत ३ हजार ६५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times