या आधी कुटुंब न्यायालयाने जयदेव श्रॉफ यांना पूनम यांना दरमहिन्याला ७ लाख रुपये आणि मुलीसाठी महिन्याला ५ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र कुटुंब कल्याण न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने हा निकाल दिला आहे. पूनम यांनी कोर्टासमोर त्यांच्या मासिक खर्चाची यादीही सादर केली होती. वारंवार होणाऱ्या पार्ट्यांसाठी ३० ते ५० लाख रुपये, व्यक्तिगत शॉपिंगसाठी १५ लाख रुपये आणि एका खासगी जेटची मागणीही पूनम यांनी केली होती. यूएपीएलमध्ये जयदेव यांना मोठा नफा होत असल्याचा हवालाही यावेळी पूनम यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र, जयदेव यांच्या वकिलांनी पूनम यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. पूनम यांच्यावर करण्यात आलेला खर्च हा जयदेव यांनी केलेला नव्हता. तर ते कंपनीचे ग्लोबल सीईओ होते. त्यामुळे कंपनीने हा खर्च केला होता. त्यामुळे मासिक खर्चासाठी व्यक्तिगत खर्चाचा हवाला देणं अयोग्य असल्याचा युक्तिवाद जयदेव यांच्या वकिलांनी केला होता. तर न्यायाधीश अजेय गडकरी यांनी पूनम यांची याचिका रद्द करत याप्रकरणावर लवकरच डिटेल ऑर्डर जारी करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
पूनम आणि जयदेव यांनी ११ वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. पूनम यांनी जयदेव यांच्यावर मारहाणीचे आरोपही लावले होते. जयदेव हे यूनायटेड फॉस्फरससहित अनेक कंपन्यांचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर ९ हजार कोटी असल्याचं सांगण्यात येतं. पूनम या जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times