नारायण राणे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अँटिलिया स्फोटके प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात असल्याचे सांगत कोणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्यात आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. राज्याचा विकास होत नाही, तसेच भ्रष्टाचार देखील वाढलेला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक असल्याचे राणे म्हणाले.
यावेळी राणे यांनी सचिन वाझे प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती केली. सचिन वाझे यांची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली?. दिशा सालियन प्रकरणातही वाझे यांच्याकडे पोस्टिंग कोणी दिली?, पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे?…, वाझेंना कोण वाचवत आहे?, असे राणे यांनी एकावर एक प्रश्न उपस्थित केले. याबाबतची सर्व माहिती उघड झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेवर केला गंभीर आरोप
सचिन वाझे या शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत असे राणे म्हणाले. वाझे यांच्याच जीवावर शिवसेना लोकांना धमक्या देत आहे, असा गंभीर आरोपही राणे यांनी केला. सचिन वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध असल्याचेही राणे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा तेथे एक मंत्री उपस्थित होता- राणे
या राज्यात हत्या होत असताना त्या आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली, असे राणे म्हणाले. दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा तेथे एक मंत्री देखील उपस्थित होता, असा दावा राणे यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
सचिन वाझे यांची दिशा सालियन प्रकरण, सुशांतसिंग प्रकरणा आणि मनसुखप्रकरणापर्यंतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली. जेलमधल्या रवी पुजारीलाही या प्रकरणात काहीतरी सांगायचे आहे, असे मी ऐकून आहे. हे लक्षात घेता आणखी कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत का, या दिशेने देखील चौकशी व्हायला हवी, असे राणे शेवटी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times