अहमदाबाद, : आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला इंग्लडच्या बेन स्टोक्सने दिले आणि त्यांना ते चांगलेच महागात पडल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याची पाहायला मिळाली. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशानने चौकार लगावला होता. पण त्यानंतर चौथ्या चेंडूवर इशानने पुन्हा एकदा एक मोठा फटका मारला. पण यावेळी चेंडू थेट बेन स्टोक्सच्या हातामध्ये विसावणारच होता. पण यावेळी स्टोक्सने हा झेल घेताला घाई केल्याचे पाहायला मिळाले आणि त्याच्या हातून हा झेल निसटला. त्यामुळे इशानला यावेळी ४० धावांवर असताना जीवदान मिळाले. पण त्यानंतर इशानने षटकारासह आपले पहिले-वहिले अर्धशतक पूर्ण केले.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली. इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर त्यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला यावेळी भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने चांगली गोलंदाजी करत दोन बळीही मिळवले. सुंदरने यावेळी दमदार फटकेबाजी करणाऱ्या जेसन रॉयला पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर सुंदरने जॉनी बेअरस्टोलाही तंबूत धाडले. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरनेही अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत दोन फलंदाजांना बाद केले.

इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रॉयने यावेळी षटकारासह इंग्लंडच्या संघाचे अर्धशतक पूर्ण केले. रॉय आणि मलान या जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. पण रॉय बाद झाल्यावर मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कारण अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी धीम्या गतीने चेंडू टाकले आणि त्यावर इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाहीत. त्यामुळेच इंग्लंडला यावेळी प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here