: करोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याने तो नियंत्रणात ठेवण्यासाठी तपासण्या आणि लसीकरण या दोन्ही मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. मात्र करोनासाठी मुंबईतील धारावीचा जो भाग तीव्र संसर्ग क्षेत्र मानला जात होता, त्याठिकाणी लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद अतिशय कमी असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाबद्दलची अनास्था, बेफिकीर वृत्ती आणि नजिकच्या लसीकरण केंद्रांची उपलब्धता नसल्याचा एकत्रित फटका येथे लसीकरणाच्या प्रक्रियेला बसला आहे. माहीम, दादर येथून प्रत्येक दिवशी लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. त्या तुलनेत मात्र अद्याप लसीकरणाच्या एकूण प्रक्रियेपासून दूर असल्याचे दिसून येतात.

वाचा:

येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अनिल पाचगणेकर यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला. ‘अद्याप धारावीकरांमध्ये लसीकरणासंदर्भात जागृती नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला करोना होणार नाही, हा भ्रम त्यांच्या मनामध्ये आहे. ज्यांना एकदा करोना होऊन गेला आहे, त्यांचीही लसीकरण करून घेण्याची मानसिक तयारी नाही. धारावीकरांना बीकेसी आणि छोटा सायन ही दोन लसीकरण केंद्रे त्या तुलनेत जवळची आहे. मात्र खुद्द धारावीमध्ये केंद्रस्थानी असलेले लसीकरण केंद्र त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करून घेण्यात पाच ते सहा तास कसे घालवायचे, हा प्रश्नही येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जातो. येथे अनेकांचे स्वतःचे लघुउद्योग आहेत तर काहीजण रोजंदारीवर काम करतात. नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण त्यातुलनेमध्ये कमी आहे. एक दिवसाचा रोज बुडवून लसीकरणासाठी कसे जाणार हा प्रश्न धारावीकर उपस्थित करतात. खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध झाली तर त्यासाठी अडीचशे रुपये भरायचीही अनेकांची तयारी नाही. अशा परिस्थितीमध्ये धारावीकरांना लसीकरणासाठी तयार करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.

वाचा:

सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी धारावीतील लोकसंख्या तसेच येथील सामाजिक शैक्षणिक स्तर लक्षात घेता जागृती करण्याची गरज व्यक्त केली. नजिकचे लसीकरण केंद्राचे पर्याय सध्या उपलब्ध नसल्याने छोट्या सायन रुग्णालयाचा विचार लसीकरण केंद्रासाठी करण्यात येईल, असे सांगितले. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ज्या केंद्रामध्ये या निकषांची पूर्तता होते तिथे लसीकरणाची सुविधा देता येणे शक्य होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘अॅप’चा वापर कसा करायचा?
‘सिरो’ सर्वेक्षणामध्ये झोपडपट्टी भागात हर्ड इम्युनिटी ही अन्य भागांच्या तुलनेत अधिक दिसून आली आहे. हर्ड इम्युनिटी विकसित झाली असेल तर लसीकरणाची गरज आहे का, हा प्रश्न विचारला जातो. तसेच अनेकांना ऑनलाइन नोंदणी कशी करायची हे माहित नसल्यामुळेही अडचण येत आहे.

असे आहे प्रमाण

करोनाच्या चाचणीची प्रक्रिया वेगाने व अधिक सुरळीतपणे पार पडावी यासाठी विभागात २० पेक्षा अधिक तपासणी केंद्रांमध्ये उद्यापासून चाचणी करण्यात येणार आहे. धारावीमध्ये आजपर्यंत ४२४४ रुग्णसंख्येची नोंद झाली असून १२५ सक्रीय रुग्ण आढळून आले. रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्यांची संख्या ३८०३ इतकी आहे. १३ मार्चला एकूण रुग्णसंख्या ४२२६ इतकी असून त्यात सक्रीय रुग्णसंख्या ११२ इतकी होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here