जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. येत्या १८ मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी रविवारी माजी मंत्री महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेले. रविवारी दुपारी दोन वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी तीनच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री यांच्या पाळधी येथील फार्म हाउसवर एकत्र झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळी सातच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे. जळगावमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन यांची उमेदवारी निश्चित केली आहे. उपमहापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times