म. टा.विशेष प्रतिनिधी, मुंबई

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने अध्यक्ष यांनी जोरदार तयारी सुरू केली असून मनसेने त्यांच्या पक्षाच्या १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत प्रथमच सदस्य नोंदणीसाठी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती दिल्या आहेत. सदस्यनोंदणी मोहिमेच्या या जाहिरातीमधून ‘अरे बघताय काय सामील व्हा’, अशी मराठीजनांना साद घातली आहे.

पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली तसेच मिरा-भाईंदर महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून या निवडणुकांच्या निमित्ताने राज ठाकरे चांगलेच कामाला लागले आहेत. त्यांनी अलिकडेच या महानगरपालिकांशी संबंधित विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आढावा घेतला. त्यानंतर आता सदस्यनोंदणी मोहिमेसाठी थेट प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरातीही दिल्या आहेत. करोनामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने प्रसारमाध्यमांची मदत घेतल्याचे कळते.

वाचा:

पक्षाच्या या सदस्य मोहिमेत मोबाइलवर स्कॅन करून, संकेतस्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्यनोंदणी करण्यावर पक्षाचा भर आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीही या मोहिमेत कसे सहभागी होतील, यावर पक्षाचा भर असल्याचे समजते. मनसेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जाहीर भाषणात राज ठाकरे या सदस्य मोहिमेचा शुभारंभ करणार होते. मात्र करोनामुळे वर्धापनदिनाचा सोहळा रद्द करण्यात आला होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here