आज एअर इंडियाचं हे विमान दिल्लीवरून पुण्याला जात होतं. एक चीनी नागरिकही या विमानातून प्रवास करत होता. विमान विमानतळावर पोहोचताच या चीनी प्रवाशाला मळमळ झाली आणि त्याने उलटी केली. त्यामुळे विमानातील इतर प्रवाशांच्या पोटात गोळाच आला. या प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. हा प्रवासी भारतात आधीपासूनच राहत आहे की चीनमध्ये करोनाचं थैमान सुरू झाल्यानंतर भारतात आला, आदी तर्कवितर्क प्रवाशांमध्ये सुरू झाले. तसेच त्याला करोनाची लागण असल्याची अफवाही विमानात पसरली. त्यामुळे प्रवाशी आणखीनच बिथरले होते. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीनंतर या चीनी नागरिकाला तात्काळ पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या चीनी प्रवाशाला पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या रक्ताचे आणि लाळेचे सँपल घेण्यात आले असून हे सँपल एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. तर या प्रवाशाने मळमळ आणि उलटी होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे विमान विमानतळावर पोहोचताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अंस विमानतळ प्रशासनाने सांगितलं. दरम्यान, तात्काळ विमान स्वच्छ करणअयात आलं. त्यानंतर थोड्यावेळाने या विमानाने दिल्लीकडे प्रयाण केलं. रोखण्यासाठी राज्यातील तीन रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यापैकी नायडू हॉस्पिटल एक आहे. महाराष्ट्रात करोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times