अहमदनगर: मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्येष्ठ नेते यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. मंगळवारी (१६ मार्च) उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी पवार यांनी गायकर यांच्यावर राग व्यक्त करताना धोतर फेडण्याची भाषा केली होती. नंतर मात्र पवार यांनीच त्यांना बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीसाठी मदत केली होती. हा पिचड यांना मोठा धक्का मानला जात आहे. ( Supporter to join NCP)

वाचा:

अकोले तालुक्यातील गायकर हे पिचड आणि पर्यायाने पवार यांचे समर्थक मानले जात. अनेक वर्षे ते जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीच्यावेळी बदलत्या राजकारणाच्या प्रवाहात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे आणि पिचड यांच्यासोबत गायकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीत दगा दिलेल्या नेत्यापैंकी पिचड हे एक होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांचाही त्यांच्यावर राग आहे. पिचड यांच्यावर टीका करण्याची संधी या दोघांनीही सोडली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी पिचडांना साथ देणाऱ्या गायकर यांच्यावरही टीका केली होती. ‘नाही त्याचं धोतर फेडलं तर मग बघा,’ अशी एकेरी, वैयक्तिक टीकाही त्यांनी केली होती.

अलीकडेच शरद पवार अकोले तालुक्यात आले होते. त्यांनी पुन्हा एकदा पिचडांवर टीका करून त्यांचे स्थानिक राजकारण संपविण्याचे आवाहन लोकांना केले. लवकरच अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे. हा कारखाना पिचड यांच्या ताब्यातून काढून घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू, अशी थेट ऑफरच पवारांनी लोकांना दिली आहे. त्यानंतर मात्र, राजकारण फिरायला सुरुवात झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनीच गायकर यांच्याविरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून गायकर यांना बिनविरोध निवडून दिले. यावरून आता पिचड यांच्याविरोधात गायकर यांचा वापर केला जाणार, हे दिसून येत आहे. त्यातच साखर कारखान्याच्या निवडणुकीचेही राजकारण असावे. त्यामुळेच गायकर आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असावेत, असे सांगण्यात येते. नुकतीच गायकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची या संबंधी बैठक घेतली. त्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी गायकर यांच्यासह त्यांचे काही समर्थक पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

वाचा:

पिचड यांचा भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा झाला नाही. त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणातून बाजूला पडल्यासारखे झाले आहेत. पवारांनी पिचडांना टार्गेट केल्यानंतर मात्र, भाजपने पिचडांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. वैभव यांना आदिवासी समाजाशी संबंधित भाजपच्या राष्ट्रीय संघटनेवर घेण्यात आले आहे. स्थानिक राजकारणात मात्र पिचडांना भाजपची मदत झालेली दिसत नाही. आता त्यांच्या जवळचे कार्यकर्ते फोडून राष्ट्रवादीने पिचडांना एकटे पाडण्याची खेळी सुरू केल्याचे दिसून येते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here