कुस्ती क्षेत्रात बिजली मल्ल म्हणून तर सांगलीच्या राजकीय आखाड्यात वसंतदादा घराण्याचे कट्टर विरोधक म्हणूनही राज्यात संभाजी पवार यांना ओळखलं जात होते. कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायची त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जात होते.
जनता दलाच्या स्थापनेनंतर वसंतदादा पाटील यांच्या हयातीत त्यांनी सांगली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली, आणि वसंतदादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर याच पक्षाच्या चिन्हावर त्यानी हट्रिक केली. नंतर पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या वतीने याच मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
६ वर्षांपूर्वी सांगलीतील भाजपच्या स्थानिक राजकारणातून ते पक्षावर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला पण त्यामध्ये यश आले नाही. शेवटी त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times