मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी दलातील अधिकारी यांना अटक झाली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. वाझेंच्या विरोधात एनआयएच्या हाती भक्कम पुरावे लागले असल्याची चर्चा आहे.

दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानापासून ५०० मीटर अतंरावर अडीच किलो जिलेटीन भरलेली स्कॉर्पिओ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. मात्र, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे. मनसुख हिरन यांची गाडी काही दिवस सचिन वाझे वापरत होते. त्यामुळं त्यांच्यावरचा संशय अधिक बळावला आहे.

वाचाः

काही दिवसांपूर्वीच अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. यामध्ये एक इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. इनोव्हा कारमधील त्या ड्रायव्हरनं ओखळ लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं. पीपीई किट परिधान केलेली ती व्यक्ती सचिन वाझेचं असल्याचा एनआयएला संशय आहे.

इनोव्हा ताब्यात

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी लावत असताना मागून एक इनोव्हा गाडी तेथे आली होती. ही गाडीही रविवारी एनआयएनं ताब्यात घेतली आहे. ही गाडी सचिन वाझे काम करत असलेल्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाची असल्याचे बोलले जात आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here