सिल्व्हासा: दादरा नगर हवेलीतील येथे एक धक्कादायक घटना घडली. नरौली परिसरात तीन वर्षीय बालिका बेपत्ता झाली होती. तपास केला असता, शेजारी राहणाऱ्या तरुणाने बालिकेवर केल्यानंतर तिची केली. त्यानंतर फ्लॅटमधील खिडकीतून तिचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर पुन्हा मृतदेह बॅगमध्ये भरून तो रस्त्यालगत फेकला. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या पित्याने आत्महत्या केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नरौली परिसरात एका फ्लॅटमध्ये राहणारी बालिका बेपत्ता झाली होती. ती बराच वेळ सापडली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. तीन-चार तास शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांना माहिती मिळाली की, मुलगी दुपारच्या सुमारास अन्य मुलींसमवेत खेळत होती. ती घरापासून खूप दूर गेलेली नव्हती. पोलिसांनी इमारतीच्या सर्व फ्लॅटमध्ये तिचा शोध घेतला. पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या फ्लॅटचीही झडती घेतली. मात्र, तिथे काहीच सापडले नाही. फ्लॅटमधील बाथरुमची काच फुटलेली होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी फ्लॅटच्या चारही बाजूला शोध घेतला. त्याचवेळी इमारतीच्या बाजूलाच असलेल्या रस्त्याच्या कडेला एक बॅग सापडली. बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. तिची चाकूने भोसकून हत्या केली होती. तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले. ज्या शेजारच्या तरुणावर संशय होता, त्याला ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात खळबळ माजली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दुसरीकडे मुलीवरील अत्याचार आणि तिच्या हत्येच्या घटनेने वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here