मुंबई– बॉलिवूडची जबरदस्त अदाकारा सोशल मीडियावर साकरीय असते. ती नेहमी तिच्या मैत्रिणीसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिला तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालायला प्रचंड आवडतं. तिच्या व्यग्र शेड्युल मधून वेळ काढून ती नेहमीच तिच्या गर्ल गॅंग सोबत फिरायला जाते आणि खूप धम्माल करते. सोशल मीडियावर आलियाचा असाच एक व्हिडीओ वायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत नाचताना दिसतेय. हा व्हिडीओ तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाचा असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

आलियाच्या बालपणीच्या मैत्रिणीचा विवाह असल्याने ती त्या खास समारंभासाठी राजस्थानला गेली आहे. तिथे ती तिच्या मैत्रिणीसोबत मजा मस्ती करताना दिसतेय. मैत्रिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला आलियाने इतर मैत्रिणींच्या तालावर ताल धरला आहे. त्या सगळ्या रॅपर बादशाहच्या ” या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसल्या. या व्हिडीओ सोबतच आलियाच्या आणखी एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यात ती ‘जलेबी बाई’ या गाण्यावर उत्तम नृत्य करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये आलियाने गुलाबी घागरा चोळी परिधान केली आहे. सोबतच आलियाच्या तिच्या मैत्रिणीसोबत एक सुंदरसा फोटोदेखील पाहायला मिळत आहे. ज्यात ती मैत्रिणीसोबत अत्यंत आनंदी दिसत आहे.

आलिया महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रात्री उशिरा शिवमंदिरात गेली होती. तेव्हा तिच्यासोबत रणबीर कपूरचा मित्र अयान मुखर्जी होता. जेव्हा आलियाला देवाकडे काय मागितलं असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा आलियाने मागितलं आहे पण सांगू शकत नाही, असं उत्तर दिलं होतं. आलिया लवकरच रणबीरसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. सोबतच तिच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची देखील प्रचंड चर्चा आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातही आलिया सीतेची भूमिका साकारणार आहे. आलियाच्या वाढदिवशी तिचा लूक प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here