मुंबईः ‘जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवली जाते. यात वाझेंचा हात असल्याचं बोललं जातं. त्यामुळं हा सर्व प्रकार एकटा माणूस करु शकत नाही. यामागचा बोलविता धनी कोण आहे. याची चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत मास्टरमाइंट कोण आणि गॉडफादर कोण हे बाहेर येईल,’ असा आरोप भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे.

मनसुख हिरन मृत्यप्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकलेले यांना पोलीस दलातून निलंबित केलं आहे. सचिन वाझे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भाजपनं सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार यांनी आज पत्रकार परिषद घेत वाझेंवर आरोप केले आहेत.

‘आयपीएल सुरु होण्याच्या आधी काही ठिकाणी सट्टेबाजी सुरु होते. या आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना धमकी दिली जात होती. तुमच्यावर छापा पडून द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, असं सट्टेबाजांना सांगितलं जायचं,’ असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

‘वाझेंचं सट्टेबाजांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांना एका माणसाचा फोन येतो. तुम्ही सट्टेबाजांकडून इतके पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, असा प्रश्न त्या व्यक्तीकडून वाझेंना केला जात होता. हा व्यक्ती म्हणजे आहेत. वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्यात यावी. वाझे – वरुण सरदेसाई यांचं आपसापातलं जे कनेक्शन आहे त्याचाही तपास करावा,’ अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

वाचाः

वाझेंच्या अटकेच्या आधी शिवसेना नेत्याची भेट

‘वाझेंबरोबर एका शिवसेनेच्या उपनगरातील एका नेत्यासोबत टेलिग्रामचं चॅट आहेत. वाझेंना अटक होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता ते कोणाला भेटायला गेले होते, हे तापासावं लागेल,’ अशा आरोपही त्यांनी केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here