बेळगाव: ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी गावातील चार तरुणांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावरून कोल्हापुरात आक्रमक झाली आहे.

सीमाभागात कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी पाहायला मिळाली. मराठी भाषेचे स्टेटस ठेवले म्हणून मच्छे गावातील चार तरुणांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असं स्टेटस या तरुणांनी ठेवले होते. यावरून पोलिसांनी त्यांना मारहाण केली. तरुणांच्या पाठीवर आणि हातावर व्रण उठले आहेत. या घटनेवरून कोल्हापूरसह महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून, अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान, २० मार्चपर्यंत बेळगाव महापालिकेवर कन्नड रक्षण वेदिकेणे लावलेला ध्वज न काढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. कोल्हापुरात संजय पवार आणि विजय देवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. तसेच चार तरुणांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेधही नोंदवला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here