वाचा:
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. भाजपच्या नेत्यांनी यात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप केला. अनेक गोष्टीही सरकारच्या निदर्शनास आणल्या. त्यानंतर वाझे यांची मुंबई क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपनं लावून धरली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास हाती घेत ‘एनआयए’नं वाझे यांना अटक केली.
वाचा:
सुधर्म वाझे यांनी हेबियस कॉर्पस याचिकेच्या माध्यमातून या अटेकलाच हरकत घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्याचा आदेश एनआयएला द्यावा, अशी विनंती त्यांनी अॅड. सनी पुनमिया यांच्यामार्फत न्यायालयाला केली आहे. ‘दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवला आहे,’ असा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times