राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. सचिन वाझेंची अटकेमुळं भाजपचं लक्ष्य शिवसेना असली तरी गृहखाते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडं असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी बैठक बोलावली होती. याच बैठकीत ते अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणार का?, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. यासंबंधी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
वाचाः
‘अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित कारभार करत आहेत. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, त्यामुळं वावड्या उठवण्याची गरज नाही,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. एटीएसकडे राहिला असता तरी सत्य पुढे येणारच होतं. तपास पूर्ण झाल्यावर कोणत्याही प्रकारचे सत्य बाहेर आल्यावर ते सत्य न दडवता आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. त्यात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही,’ असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times