सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली असून यावर खासदार यांनी जोरदार शब्दांत टीका केली आहे. राणे यांचे राष्ट्रपती राजवटीबाबतचे पत्र केंद्र सरकारने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले आहे, असे सांगत राऊत यांनी राणे यांची खिल्ली उडवली. ( )

वाचा:

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. येथे कुणीही सुरक्षित नाही. शिवाय हे सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, असा दावा करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. त्याबाबत आज सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती आलेले नाही आणि येणारही नाही असे म्हणत विनायक राऊत यांना राणे यांना प्रत्युत्तर दिलं.

वाचा:

‘नारायण राणे यांना काही काम धंदा नाही. भाजपनेसुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिलं आहे. दिल्लीमध्ये संसदेत यांना धड हिंदी बोलता येत नाही आणि इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचं काय, हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो मग असं काहीतरी पत्र द्यायचं आणि चर्चेत राहायचं, इतकंच ते सध्या करत आहेत’, अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला.

वाचा:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशा पद्धतीची मागणी अनेक वेळा करण्यात आलेली आहे. मात्र असं कुणीही म्हटलं म्हणून राष्ट्रपती राजवट लागू होत नाही. केंद्र सरकारने राणे यांचे पत्र कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले आहे. हे त्यांना माहितीही आहे पण कुठेतरी बातमी छापायची, प्रकाशझोतात राहायचं म्हणून ही धडपड चालली आहे, असा टीकेचा बाणही राऊत यांनी सोडला. ‘नारायण राणे हे अतृप्त असलेले राजकारणी आहेत. त्यांचा सातत्याने मुख्यमंत्रिपदावर डोळा होता पण त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाहीत’, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here