अमरावतीः ऑटोमॅटिक पिस्तूल व १२ जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या एका युवकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (दि. १४) पेट्रोलिंगदरम्यान नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वलगाव मार्गावरील एका बेकरी समोर अटक केली.

सैय्यद वसिम नुर (३०, रा. फरीदनगर, वलगाव मार्ग, अमरावती) असे पिस्तूल व काडतुसांसह पकडलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तुल (कट्टा), अॅटोमॅटीक मॅगझिन, ९ एमएम आकाराचे बारा जिवंत काडतूस, बजाज पल्सर दुचाकी, एक मोबाइल, असा एकुण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी जप्त केलेल्या या ऑटोमॅटिक पिस्तुलावर ‘मेड इन आर्मी’असे नमूद केले आहे. पोलिसांनी सैय्यद नूरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम आर्मअॅक्ट व महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याला आजच पोलिसांनी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here