मिळालेल्या माहितीनुसार, राणीगावच्या एका विहिरीत १५ मार्च रोजी मध्यरात्री तरुणीचा मृतदेह काही गावकऱ्यांना दिसला. त्यांनी पोलिसांत कळवले. पोलिसांनी तपास करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगिता भानुदास मुंडे (वय १८, रा. , ता. धारणी, जिल्हा ) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या मर्जीविरोधात तिचे लग्न ठरवण्यात आले होते. तिचा साखरपुडाही झाला होता. पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख ठरवली होती. त्यामुळे घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. मात्र, तिला मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे ती दोन दिवसांपूर्वीच घर सोडून निघून गेली होती.
कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिचा मृतदेह शिवाराबाहेरील विहिरीत आढळला. कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर धारणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सावरकर आणि इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह धारणी येथे पाठवून विच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापूर करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times