मुंबईः भाजपचे आमदार यांनी सचिन वाझे प्रकरणात थेट युवासेनेचे सचिव यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले होते. यावर आता वरुण सरदेसाई यांनी नितेश राणेंवर थेट निशाणा साधला आहे. आरोप सिद्ध करा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारात सरदेसाई यांनी दिला आहे.

नितेश राणेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत आहे. मी एक सुंसकृत व सुशिक्षित कुटुंबातून आलो आहे तसंच, मला राजकारणाची आवड असल्यानं मी या क्षेत्रात आलो, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी सगळ्यांनाच माहिती आहे. राणे कुटुंबाला बेछूट आरोप करण्याची सवय आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी भाजपवर आरोप केले होते. व आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहेत. महाराष्ट्रातील जनताही राणे कुटुंबाला गांभीऱ्यानं घेत नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

नितेश राणे यांचे आजचे आरोप मनाला वेदना देणारे आहेत. या आरोपांमुळे माझ्या राजकीय करकिर्दीला पुढे धोका निर्माण होऊ नये म्हणून मी कायदेशीर पाऊल उचलणार आहे. राणेंनी केलेले घाणेरडे आरोप केले तथ्यहिन असून त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. त्यानी केलेले आरोप सिद्ध करावे नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

नितेश राणेंनी काय केले होते आरोप

सचिन वाझे आयपीएल सुरु झाल्यानंतर सट्टेबाजांना धमकी देऊन १५० कोटींची खंडणी मागितली होती. वाझेंचं सट्टेबाजांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांना एका माणसाचा फोन येतो. तुम्ही सट्टेबाजांकडून इतके पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, असा प्रश्न त्या व्यक्तीकडून वाझेंना केला जात होता. हा व्यक्ती म्हणजे वरुण सरदेसाई आहेत. वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्यात यावी. वाझे – वरुण सरदेसाई यांचं आपसापातलं जे कनेक्शन आहे त्याचाही तपास करावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here