मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं काही दिवसांपूर्वीच ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्यानं आता सोशल मीडियाचा निरोप घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानत आमिरनं ही त्याची अखेरची पोस्ट असल्याचं स्पष्ट केलं. आमिरनं ही पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्राम दोन्ही ठिकाणी शेअर केली.

आमिरनं त्याच्या नोटमध्ये लिहिलं, ‘नमस्कार मित्रांनो, माझ्या वाढदिवसाला तुमचं सर्वांचं एवढं प्रेम पाहून माझं मन भरून आलं. यासाठी तुमचे सर्वांचे खूप आभार. ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे. मी निर्णय घेतला आहे की मी माझं सोशल मीडिया बंद करणार आहे. पण आपण एकमेकांच्या संपर्कात राहू जसे आतापर्यंत होतो.’

यासोबतच आमिरनं त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिशिअल सोशल मीडिया हॅन्डलची माहिती सुद्धा दिली आहे. ज्यावर चाहते त्याला फॉलो करू शकतात. या सोशल मीडिया हॅन्डलवरून आमिरच्या आगामी चित्रपटांबद्दल सर्व अपडेट दिल्या जाणार आहेत. यानंतर आमिर त्याच्या पर्सनल सोशल मीडिया हॅन्डवर सक्रिय असणार नाही मात्र त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हॅन्डवरून तो चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे. आमिरनं त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘ प्रोडक्शननं आपलंअधिकृत सोशल मीडिया अकाउंट तयार केलं आहे. ज्यावर माझे आणि माझ्या आगामी चित्रपटांचे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत.’

आमिरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो शेवटचा अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांच्यासोबत ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यानंतर आता मागच्या वर्षभरापासून आमिर त्याच्या आगमी चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’वर काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट ऑस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here