नवी दिल्लीः दिल्लीतील प्रकरणी ( ) साकेत कोर्टाने आरोपी ( ) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना असल्याचं निकाल देताना कोर्टाने नमूद केलं आहे. यापूर्वी २०१३ मध्ये शहजाद अहमद याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही बाटला हाउस चकमकीच्या ( ) वेळी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. तर त्यांचे दोन साथीदार आतिफ आमीन आणि मोहम्मद साजिद हे ठार झाले होते. तर एका आरोपीला घटनेच्या ठिकाणीच अटक करण्यात आली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांतील पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे शहीद झाले होते. तर २ पोलीस जखमी झाले होते.

आरीज खान हा २००८ मध्ये दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि यूपीतील कोर्टात झालेल्या स्फोटांप्रकरणी मुख्य सूत्रधार होता. या स्फोटांमध्ये १६५ जण ठार झाले होते. तर ५३५ जण जखमी झाले होते. त्यावेळी आरीज याच्यावर १५ लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. तसंच इंटरपोलद्वार रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. यूपीतील आझमगढचा असलेला आरीज खान उर्फ जुनैद या दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक केली होती. कोर्टाने शिक्षेसोबत ११ लाखांची नुकसान भारपाईचे आदेशही दिले आहेत. त्यातील १० लाख रुपये हे शहीद पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या कुटुंबीयाला दिले जातील.

दोषीकडे घातक शस्त्रे होती आणि त्याच शस्त्राने त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे शहीद झाले, असं सांगत सरकारी वकीलांनी दोषी आरीजला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. एखाद्या व्यक्तीची हत्या आणि पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येत फरक आहे. ही बाब सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात मान्य केली आहे. दिल्लीतच नाही तर जयपूर, अहमदाबाद आणि यूपीतील स्फोटांमध्ये दोषीचा हात होता. यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले, असं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं. बाटला हाउस चकमक प्रकरणी कोर्टाने कोर्टाने ८ मार्चला आरोपी आरीज खान याला दोषी ठरवले होते. १५ मार्चला निकाल सुनावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here