सिंधुदुर्ग: ‘ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये ज्या विचारवंतांच्या हत्या झाल्या त्याचा थेट ‘ आरएसएस ‘शी संबंध जोडला जात होता. त्यावेळी भाजपची नैतिकता कुठे गेली होती? तेव्हा फडणवीस यांनी राजीनामा का दिला नव्हता?’, असा थेट सवाल शिवसेना खासदार यांनी भाजपला केला आहे. ( )

वाचा:

भारतीय जनता पक्षाची मंडळी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत ते पाहता अनेक प्रश्न उपस्थित करावे लागतील. फडणवीस यांच्या कारकीर्दीमध्ये झालेली जस्टिस लोया यांची आत्महत्या की हत्या हा प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कोपर्डी प्रकरण असेल वा अनेक ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्या असतील त्याचा काहीच मागमूस लागू शकलेला नाही, असे नमूद करत विनायक राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यांच्या अटकेनंतर या कटात कोण सहभागी होतं त्यांना जरूर पकडावं. त्यासाठी शिवसेनेला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, असेही राऊत पुढे म्हणाले.

वाचा:

एनआयए या प्रकरणात तपास करत आहे. हा तपास पूर्ण होवू देत. महाराष्ट्र सरकारने त्यात कुठेही अडथळा आणलेला नाही, असे नमूद करताना साळसूदपणाचा आव आणून जे आज मुख्यमंत्र्याना सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी तर अशी अनेक प्रकरणे दडपलेली आहेत, पचवलेली आहेत आणि त्यांच्या पापावर पांघरुण घालण्याचं काम केलंय. त्यावेळेला त्यांनी राजीनामा का नाही दिला?, असा सवाल राऊत यांनी केला. आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात ठेवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्याचा पोटशूळ विरोधकांना झाला आहे. हे यश त्यांना बघवत नाही. म्हणूनच सातत्याने सरकारविरोधात भूमिका घेतली जाते, असा आरोपही राऊत यांनी केला.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here