संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुणे शहरात झाला. त्यानंतर संजनाचे शालेय शिक्षण बिशप शाळेमध्ये झाले. त्यानंतर सिम्बॉयसिसमधून संजनाने बी.टेक पूर्ण केले. सिम्बॉयसिसमध्ये असताना संजनाने सुवर्णपदकही मिळवले होते. त्यानंतर संजना ही आयटी आणि डिजीटल मार्केटींग क्षेत्राकडे वळली. त्यानंतर एक अँकर म्हणून तिने काम करायला सुरुवात केली. संजना मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले. संजना २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती.
गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतून स्वत:ला वगळण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचे सांगतले. त्यानंतर बुमराहच्या लग्नाच्या चर्चेने जोर पकडला. सोशल मीडियावर देखील बुमराह कोणाशी विवाह करणार याची चर्चा सुरू होती. प्रथम एका दक्षिणेतील अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. पण नंतर पुण्यात जन्मलेल्या संजना गणेशन सोबत तो विवाह करणार असल्याचे समोर आले. त्यानंतर आज या दोघांचे लग्न झाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times