राज्यात करोनाचा धोका वाढू लागला आहे. गेले काही दिवस १५ हजारांवर रुग्णांची दररोज भर पडत आहे. करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही लाखाच्या वर गेली आहे. मृत्यूदर कमी असला तरी वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. त्यामुळेच नागरिकांना शिस्त लावण्यासाठी निर्बंध लावले जाण्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्षात आज आदेश जारी करण्यात आला असून राज्यात नव्याने अनेक निर्बंध लावले गेले आहेत.
असे असतील निर्बंध:
१. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिंगल स्क्रीन थीएटर्स आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी असेल.
२. कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.
३. लग्न समारंभाला केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तर अंत्यविधीला केवळ २० जण उपस्थित राहू शकतात.
४. आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावीत. वर्क फ्रॉम होमवर भर देण्यात यावा.
५. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दरताशी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण उपलब्ध जागेच्या अनुषंगाने मर्यादित करावे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times