नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २००० रुपयांची गुलाबी नोट ( ) चलनात आणण्यात आली होती. पण आता या दोन हजार रुपयांच्या या नोटेची छपाई बंद आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री ( ) यांनी संसेद एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात माहिती दिली. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २००० रुपयांच्या नोटेची छपाई न करण्यास प्रेसला सांगण्यात आलं. नोटांच्या छपाईबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून सरकार निर्णय घेतं, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
नोटा छापताना नागरिकांना व्यवहारत कुठलीही अडचण होऊ नये, याची काळजी घेतली जाते. २००० रुपयांच्या नोटेचा व्यवहारात कमी उपयोग केला जातोय. मार्च २०१८ मध्ये २००० रुपयांचे ३३६२ मिलीयन पीस म्हणजे एकूण चलनाच्या ३.३७ टक्के नोटा आणि ३७.२६ टक्के मूल्य असलेल्या नोटा व्यवहारात होत्या, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
२६ फेब्रुवारी २०२१ ला २००० रुपयांच्या २४९९ मिलीयन पीस, एकूण चलनाच्या २.०१ टक्के नोट आणि १७.७८ टक्के मूल्य असलेल्या नोटा चलनात होत्या. पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेबंर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times