मुंबई: लिमिटेड कंपनीने (DHFL) केलेल्या कर्ज घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री यांची कन्या आणि जावई यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अंधेरीतील कमर्शियल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ( )

वाचा:

अंधेरी पूर्व येथे कालेडोनिया या इमारतीत प्रीती व राज यांच्या मालकीच्या जवळपास १० हजार ५५० स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता असून त्या ईडीने जप्त केल्या आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपातील जप्ती असून जप्त मालमत्ता ३५.४८ कोटी रुपये इतक्या किमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दिवाळखोरीत निघालेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी पीएमसी बँकेत केलेल्या कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने मनी लाँडरिंगचाही गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यात मेसर्स जिंदल कंबाइन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

वाचा:

आणि घोटाळे!

पीएमसी बँकेतील दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीचा (डीएचएफएल) दिलेले ३ हजार ६८८.५८ कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. नंतर येस बँकेतील या कंपनीचा कर्ज घोटाळा पुढे आला. या प्रकरणात वाधवान बंधूंना अटक करण्यात आली आहे व त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. येस बँक घोटाळ्यात ईडीने बँकेचे सहसंस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांची १ हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. दुसरीकडे डीएचएफएलला दिवाळखोरीत काढण्यात आले असून त्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०२० मध्येच सुरू झालेली आहे. हे प्रकरण आरबीआयने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे पाठवलेले आहे. त्याआधी कंपनीचं संचालक मंडळ बरखास्त करून आर. सुब्रमण्यम कुमार यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here