नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने ( ) वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक ( ) बोलावली आहे. ही बैठक १७ मार्चला बुधवारी दुपारी १२.३० वाजता होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली आणि यूपीसह अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव ( ) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच संबंधित राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे आणि ही वाढत वेगाने होत आहे. यामुळे आता सतर्कता नाही बाळगली तर देशात करोनाने आणखी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करोनाने देशात कहर केला होता. देशात त्यावेळी करोनाचे दररोज १ लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून येत होते. आता देशात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात करोना रुग्णांच्या संख्येत ३.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे २६,२९१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. करोनाने ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी करोनाचे २५,३२० रुग्ण आढळून आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here