भारतीय किसान युनियनमधील भानू गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी सोमवारी मोठा आरोप केला. सिंघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या विविध शेतकरी संघटना या काँग्रेसने विकत ( congress sponsored ) घेतलेल्या आहेत. हे आम्हाला २६ जानेवारीला माहिती पडलं. हे सर्व काँग्रेसने विकत घेतलेले आणि त्यांनी पाठवलेले होते. २६ जानेवारीला त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. लाल किल्ल्यावर दुसरा झेंडा लावला. त्याच दिवशी आम्ही ठरवलं. यांच्यासोबत रहायचं नाही आणि आम्ही परतलो, असं ते म्हणाले.
केंद्रासोबत चर्चेसाठी MSP वर समितीची बनवण्याचा विचार
केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा आमचा विचार आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांची एक समिती बनवण्यास आपण सांगणार आहोत. इतरांनी पाठवलेल्या माणसांना हे आंदोलन ४ ते ५ वर्षे आणखी लांब खेचायचे आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही, असं भानू प्रताप सिंह यांनी सांगितलं.
लाल किल्ल्यावरील हिंसेनंतर आंदोलन मागे
दिल्लीत २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियनमधील (भानू ) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेतला होता भानू यांच्यासह भारतीय किसान युनियन (लोकशक्ती) आणि भारतीय किसान युनिटन (एकता) या संघटनाही आंदोलनापासून वेगळ्या झाल्या. दोन्ही संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेत हा निर्णय घेतला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times