नांदेड: मुंबईत यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी यांना राष्ट्रीय तपास संस्थेने () अटक केल्याने एकच खळबळ उडाली असून सरकारमधील तिन्ही पक्षांतून यावर वेगवेगळी मते मांडण्यात येत आहेत. यात आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नेते यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ( )

वाचा:

करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांना सचिन वाझे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारले असता त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले.

वाचा:

अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरन मृत्यू या दोन्ही प्रकरणांत राज्य सरकारच्या माध्यमातून तपास सुरू होता. असे असताना या प्रकरणी तपासात एनआयएची आवश्यकता का पडावी, हा प्रश्न आहे. राज्यात अनेक चांगले अधिकारी आहेत. या प्रकरणांचा निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने तपास करू शकतात. पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार त्यासाठी सक्षम आहे. म्हणून राज्याच्या कामात केंद्राचा हा अकारण हस्तक्षेप आहे असे मला दिसते, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले.

वाचा:

शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवा!

मागील दोन आठवड्यांपासून इतर महानगरांसमवेत नांदेड जिल्ह्यातील वाढती करोना बाधितांची संख्या काळजी करण्यासारखी आहे. हा प्रार्दुभाव अधिक वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश दिले असून, जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजना संदर्भात शासन कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी दिला. जिल्ह्यात यापूर्वी करोना उपचारासाठी प्रत्येक तालुकानिहाय जी यंत्रणा उभी केली होती त्यात आरोग्याच्यादृष्टीने अत्यावश्यक उपचाराच्या सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले व प्रशासकीय यंत्रणाना निर्देश दिले. जिल्ह्यातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने त्याची पाहणी करून तेथे सर्व प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. आरोग्याबाबतच्या सोयी सुविधा सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी अधिक दक्ष असावे, असे अशोक चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here