वाचा:
सिंघानिया स्कूल, घोडबंदर रोडवरील कार्मेल स्कूल, पंचामृत सोसायटी येथे ३ पादचारी पूल उभारणार आहे. त्यातील दोन पूल मेट्रोच्या मार्गामुळे बाधीत होणार आहेत. या कामातून महापालिकेची १३ कोटी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करून ही कामे सत्ताधारी शिवसेनेकडून निवडणूक निधीसाठी केली जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला होता. या आरोपानंतर संतप्त नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी डुंबरे यांना १२ मार्च रोजी महापालिकेतील त्यांच्या कार्यालयात घेराव घालत घोषणाबाजी केली होती. तसेच माफी मागण्याची मागणी केली होती. या घेरावामुळे करोना आपत्तीच्या काळातील मनाई आदेश आणि सुरक्षित वावराचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच या प्रकाराची माहिती मिळताच महापालिका मुख्यालयात पोहचलेल्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडविले असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपने संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडेही करण्यात आली होती. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या सहा नगरसेवक, नगरसेविकांसह ३० ते ४० महिला, पुरुष कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापौर नरेश म्हस्के यांना संपर्क केला असता, हा गुन्हा तितका गंभीर नसून या प्रकरणी तक्रारदार पोलीसच असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
सुरक्षा रक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड
भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांना घेराव घालण्यासाठी आलेल्या गर्दीला मज्जाव न करणाऱ्या गेटवरील सुरक्षा रक्षकांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. या सुरक्षारक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ कमी करण्यात यावे. तसेच कर्तव्यातील कसुरीबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी सुरक्षा अधिकारी यांना दिले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times