वाचा:
ही घटना २९ जून २०१४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात घडली होती. (वय ३२) असे या प्रकरणातील फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांचा ९ वर्षीय मुलगा आर्यवर्ष हा त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. यावेळी बालकोटे यांचा पाळीव कुत्रा व अन्य एक कुत्रा या मुलाला चावला. या दोन्ही कुत्र्यांनी या मुलाच्या मानेला, खांद्याला आणि पायाला चावा घेत त्याला जखमी केले. सोनल यांनी याप्रकरणी नंदनवन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी भादंविच्या कलम २८९ आणि सीआरपीसीच्या कलम २४८ (१) अन्वये गुन्हे दाखल केले. पोलीस हवालदार महादेव कोरपे यांनी तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील मोना राऊत यांनी सरकारची बाजू मांडली तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय यादव आणि हवालदार प्रमोद यावले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.
वाचा:
न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपी संगीता यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे नमूद करीत त्यांना दोषी ठरविले. त्यांना सहा महिन्याच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलाची आई आणि याप्रकरणातील फिर्यादी सोनल यांना नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिली जावी, असे आदेश न्यायालयाने दिले. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाचीही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times