माहूर तालुक्यात वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने, वाई बाजार येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे यांना मारहाण केलीय. तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पोलीस पाटील मोरे ह्या पार्डी रोडवर थांबल्या होत्या. दरम्यान वडसा गावातील हिरव्या रंगाचा जॉन डीयर कंपनीचा ट्रॅक्टर पैनगंगा पात्रातून वडसा मार्गे वाई बाजार येथे वाळू घेऊन आला. मोरे यांनी वाळू वाहतूकसाठी रॉयल्टी आहे का अशी विचारणा केली असता ट्रॅक्टरवरील वडसा येथील इम्रान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने लोका समक्ष महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे यांचा हात धरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत थापड बुक्क्यांनी मारहाण केलीय. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नांदेड जिल्ह्यात कुठेही महसूल प्रशासनाकडून वाळू घटांचे लिलाव झाले नाहीत. अवैध पद्धतीने रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा अवैध वाळू उपसा महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचं बोललं जातंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times